आई ईलय गे!

सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या समोर आपलं हक्काचा घर. "फक्त रस्ता ओलांडा, ना गाडी - ना रिक्षा - ना हमाल, हीच आहे खरी धमाल".

सावंतवाडी स्टेशन समोर साकारत आहे "सावंतवाडी एन्क्लेव्ह", १२६ सदनिकांचा मेगा प्रकल्प. सर्व सोईने युक्त. दुकाने, उपहार गृह, बँक सर्व काही आपल्या प्रकल्पात. सर्व स्वप्नवतच ना. आणि हो, सात मजल्यांचा टॉवर अगदी लिफ्ट सह. अगदी आपल्या मुंबई - पुण्याच्या सारखे प्लँनिंगचे घर.

सावंतवाडी म्हटले कि डोळ्यासमोर येते ते आपले आजोळ. सिंधुदुर्गातील खरोखरच एक अप्रतिम आणि ऐतिहासिक शहर. मोती तलावाच्या काठचा राजवाडा, रंग बिरंगी लाकडी खेळणी, खेकडे खायचे तर ते वाडीचेच. लगतच्या समुद्र किनाऱ्यावरून येणारे ताजे फडफडीत मासे. आंबोलीच्या घाटातून येणाऱ्या रानभाज्या, कागदी वाली, एकूण काय तर खवय्यांचे माहेर घर.

नरेंद्र डोंगरावर वसलेले चैतन्य आणि नरेंद्राच्या कुशीत साकारलेले "नवीन सावंतवाडी" म्हणजेच सावंतवाडी रोड स्टेशन परिसर. सावंतवाडी रोड स्टेशन म्हणजे कोकण रेल्वेचा मानबिंदू. पहिली कोकण रेल्वे, मुंबई ते सावंतवाडी पर्यंतच धावली. रेल्वे स्टेशनच्या सोबतीला जवळूनच धावणारा मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, एकूणच काय तर तळ कोकणचे मळगाव (सावंतवाडी रोड) हे गाव, आता एक हॉटस्पॉट झाला आहे. येथून सर्व समुद्र किनारे मग ते गोव्या चे असो किंवा शिरोडा वेळागर, आरवली चे सागर तीर्थ, आरोंदा - किरणपाणी खाडी, वेंगुर्ल्याचे बंदर अगदी हाकेच्या अंतरावर. सिंधुदुर्गाचे 'महाबळेश्वर' असणारे, थंड हवेचे ठिकाण म्हणजेच आपले आंबोली हील स्टेशन अगदी एका तासावर.

सावंतवाडी एन्क्लेव्ह या प्रकल्पात स्टुडिओ अपार्टमेंट (१ RK), १ BHK व २ BHK या सदनिकांचे नियोजन करण्यात आलेले आहे. हा प्रक्लप अगदी RERA रजिस्टर्ड आहे. प्रत्येकाच्या गरजे प्रमाणे व आपल्या बजेट प्रमाणे आपण निवडू शकता आपले स्वतःचे हक्काचे घर. सर्व सदनिकांत बालकनीचे नियोजन केले आहे. या शिवाय भरपूर एक्सटर्नल ऍमेनिटीज सह हा प्रकल्प सुसज्जित आहे. क्लब हाऊस मध्ये जिम्नॅशियम, पार्टी हॉल, मुलांना खेळण्यासाठी गार्डन, कोर्टयार्ड गार्डन, सर्व लिफ्ट्सना डिझेल जनरेटर बॅकअप, फायर फायटिंग सिस्टिम, सर्व ग्राउंड फ्लोअर लॉबी मध्ये CCTV कॅमेरा अशा अनेक ऍमेनिटीज सावंतवाडी एन्क्लेव्ह मध्ये असतील.

तर या आणि लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातील घर, अगदी मोक्याच्या ठिकाणी, सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या समोर 'सावंतवाडी एन्क्लेव्ह' इथे.

आपणास काही शंका व अधिक माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या क्रमांकावर वर संपर्क करा.

Call On : +91 98199 66660
Email : sales@landkraft.in